All of us should become Nama hatta Traders
When Every Ones Undertakes the Path to Spread Krishna Consciousness Amongst Non-Devotees ; then there is hope. I have started a Mission Called Ajapa Mission supporting the ISKCON Mission especially to Spread Srila Prabhupada's dream of making Sriman Mahaprabhu's Name a Household Name. Kindly Share with as many devotees and non-devotees. Make this a Mass MovementAjapa MissionGaudiya Dhara
Read more…
Comments
कृपया माझा दंडवत प्रणाम स्वीकार करा
महाराष्ट्रामध्ये प्रचारासाठी (विशेषतः प्रभुजींसाठी)
(तुकारामगाथेमधील (महाराष्ट्राचे संत तुकाराम महाराज (१६०९-१६५०)) काही अभंग वाचनात आले ते देत आहे.)
श्रीचैतन्य महाप्रभुनी संत तुकाराम महाराजांना दिक्षा दिली.(श्रीचैतन्य चरितामृत मध्यलीला, ९.२८२, तात्पर्य )
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव । आपणचि देव होय गुरु ॥१॥सापडविले वाटे जात गंगास्नाना । मस्तकी तो जाणा ठेविला कर ॥२॥
राघव चैतन्य केशव चैतन्य । सांगितली खुण मालिकेची ॥४॥बाबाजी आपुले सांगितले नाम । मंत्र दिला रामकृष्ण हरि ॥५॥
माघ शुध्द दशमी पाहोनि गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे ॥६॥
(Sri Tukarama states in his abhangas that he received the guru-mantra containing the holy names of Krishna, Rama, and Hari names of God in the maha-mantra: Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare/ Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. (Hare is the vocative form of both Hara and Hari. )
Tukarama has revealed through his renowned devotional writings that he received his mantra through the medium of a dream from a divine personality he called “Raghava Chaitanya, Keshava Chaitanya.” Scholars and historians cite evidence that Saint Tukarama had some mystical connection with Chaitanya Mahaprabhu. Gaudiya Vaishnavas (followers of Lord Chaitanya) believe that Sri Chaitanya Mahaprabhu initiated Sri Tukarama by way of this transcendental dream.)
(Ref.by: Sadhusang.com)
कांद्याविषयी
कांद्यासाठी जालें ज्ञान । अवघे जन नाडिलें ॥1॥ काम क्रोध बुचबुची । भुंके ०० व्यालीची ॥ध्रु.॥
पूजेलागीं द्रव्य मागे । काय सांगे शिष्यातें ॥2॥ तुका ह्मणे कैंचें ब्रह्म । अवघा भ्रम विषयांचा॥3॥
पुराणिक म्हणविती । जाणोनि कांदे ते भक्षिती । अगस्तीचे मूत्रमळ । लावून म्हणती कृष्णावळ ॥ध्रु.॥
...........................। ............................. ।............................।...................................॥ ॥
तुळसीवृंदावनीं उपजला कांदा । नावडे गोविंदा कांहीं केल्या ॥1॥ तैसे वंशामध्यें जाले जे मानव । जाणावे दानव अभक्त ते ॥ध्रु.॥
केवडयामधील निगपध कणसें । तैशीं तीं माणसें भक्तिहीन ॥2॥ तुका ह्मणे जेवीं वंदनांतिल आळी । न चढे निढळीं देवाचिया ॥3॥
मांसाहाराविषयी
मांस खातां हाउस करी । जोडुनि वैरी ठेवियेला॥1॥ कोण त्याची करिल कींव । जीवें जीव नेणती ॥ध्रु.॥
पुढिलांसाटीं पाजवी सुरी । आपुली चोरी अंगुळी ॥2॥ तुका ह्मणे कुटिती हाडें । आपुल्या नाडें रडती ॥3॥
हरीनामाविषयी
नाम आहे जयापाशीं । जेथें राहे तेथें चि काशी॥1॥ ऐसा नामाचा महिमा । जाणे वाल्मीक शंकर उमा ॥ध्रु.॥
नाम प्रल्हादबाळ । जाणे पापी आजामेळ ॥2॥ नाम जाणे तो नारद । नामें ध्रुवा अक्षय पद ॥3॥
नाम गणिकेतें तारी । पशु गजेंद्र उद्धारी॥4॥ नाम जाणे हणुमंत । जाणताति महासंत ॥5॥
नाम जाणे शुकमूतिऩ । जाणे राजा परिक्षिती ॥6॥ नाम जाणे तुका । नाहीं संसाराचा धोका ॥7॥
मानवी जीवनाचे महत्व
वृद्धपणीं आली जरा । शरीर कांपे थरथरा ॥1॥ आयुष्य गेलें हें कळेना । स्मरा वेगीं पंढरिराणा ॥ध्रु.॥
दांत दाढा पडिल्या ओस । हनुवटि भेटे नाकास ॥2॥ हात पाय राहिलें कान । नेत्रा पाझर हाले मान ॥3॥
अंगकांति परतली । चिरगुटा ऐसी जाली ॥4॥ आड पडे जिव्हा लोटे । शब्द नये मुखा वाटे॥5॥
लांब लोंबताती ०० । भरभरा वाजे ०० ॥6॥ तुका ह्मणे आतां तरी । स्मरा वेगीं हरी हरी ॥7॥
वृद्धपणी न पुसे कोणी । विटंबणी देहाची ॥1॥ नव द्वारें जाली मोकळीक । ०० सरली वाजती ॥ध्रु.॥
दंत दाढा गळे थुंका । लागे नाका हनुवटी ॥2॥ शब्द नये मुखावाटा । करिती चेष्टा पोरें ती ॥3॥
तुका ह्मणे अजूनि तरी । स्मरें श्रीहरी सोडवील ॥4॥
देवतांविषयी
शिव शक्ति आणि सूर्य गणपति । एक चि ह्मणती विष्णूस ही ॥1॥ हिरा गार दोनी मानिती समान । राजस भजनें वांयां जाती ॥ध्रु.॥
अन्य देवतांसि देव ह्मणऊन । तामस जीवन तमोयोग्या ॥2॥ वांयां जायासाठीं केलासे हव्यास । अन्य देवतांस देवपण ॥3॥
आपुलिया मुखें सांगतसे धणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥4॥ धन्य ते वैष्णव भजती केशव । सात्विक हे जीव मोक्षा योग्य ॥5॥
तुका ह्मणे मोक्ष नाहीं कोणापासीं । एका गोविंदासी शरण व्हा रे ॥6॥
असे बरेच अभंग आहेत तरी ते एका योग्य वरिष्ठ वैष्णवांकडून समजून घ्या.
माझे मित्र श्रीमान अधिकारी पुरुषोत्तमआनंद प्रभू संत तुकाराम महाराजांच्या चरित्राचे अभ्यासक आहेत त्यांचेकडून समजावून घेऊ शकता.(भ्रमणध्वनी क्र. ९८६०६५६८६०)
Jai Jai Shree Radhey Shyam
Everybody should read book written by HH Loknath Swami Maharaj which reveals imprtance of Pandhrpur dham,
Haribol!