0 Radha hi bawari Posted by shailendra badriprasad sharma on July 24, 2010 at 5:43pm रंगात रंग तो शामरंग पाहण्या नजर भिरभिरते,ऎकून तान, विसरून भान ही वाट कुणाची बघते,त्या सप्त्सुरांच्या लाटेवरूनी साद ऎकूनी होई,राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी ॥ धॄ॥हिरव्या (२) झाडांची, पिवळी पाने झुलताना,चिंब (२) देहावरूनी, श्रावणधारा झरताना,हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई,हा उनाड वारा गूज प्रितीचे कानी सांगून जाई,त्या सप्त्सुरांच्या लाटेवरूनी साद ऎकूनी होई,राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी ॥ १॥आज इथे या तरूतळी, सूर वेणूचे खुणावती,तुज सामोरे जाताना उगा पाऊले घुटमळती,हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई,हा चंद्र चांदणे ढगाआडूनी प्रेम तयांचे पाही,त्या सप्त्सुरांच्या लाटेवरूनी साद ऎकूनी होई,राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी ॥ २॥ E-mail me when people leave their comments – Follow
Comments